इचलकरंजी (प्रतिनिधी सतिश चव्हाण) : कबनुर येथील कु. सुयश शिवाजी चव्हाण यांची मध्य प्रदेश मधील सागर येथे अग्नीवीरचे ट्रेनिंग मध्ये महार रेजिमेंट ट्रेनिंग सेंटरच्या कसम परेडमध्ये 886 कॅन्डिडेटमधून परेड कमांडरपदी निवड होऊन त्याला संचलन करण्याची संधी मिळाली.
तसेच बेस्ट इन ड्रिलचे सुवर्णपदकही त्याला मिळाले त्यामुळे कबनूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला संचलन करताना सुयशचा म्हणजे कबनूर गावचा आवाज सुमारे 20 एकरात घुमला तसेच कबनुर गावातील नेतेमंडळी व गावकरी पाहुणेमंडळी मित्रपरिवार यांनी त्यांचे स्वागत केले सुरेश हा येथील कोतवाल शिवाजी चव्हाण यांचा चिरंजीव आहे सुयशचे वडील शिवाजी व आई सुनिता चव्हाण यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले







