पनवेल (प्रतिनिधी गणेश पाटील) : आपल्या घरामध्ये जळण्यासाठी वापरत असलेला गॅस म्हणजे एक प्रकारचा बॉम्ब असून स्वयंपाक घरात जेवणाच्या ओट्याखाली एक नाहीतर दोन सिलेंडर आपण ठेवतोच मात्र त्याच्यासाठी वापरत असलेली रबरीनळी बनविणाऱ्या कंपनीने तिच्या वापराची मुदत छापलेली असते, आपण आपले कुटुंब शेजाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ती त्या दिनांकालाच बदलावी ज्यामुळे मोठा अनर्थ टळेल असे मार्गदर्शन ग्रामपंचायत परहुर ने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत सांगितले.
यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. शैलेश वर्तक, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील, ग्रामविकास अधिकारी श्रीमती पूजा पाटील, श्री तुकाराम सावणेकर, माजी सरपंच, श्री. प्रशांत बागवे, कृषी सहाय्यक, श्री. अजित केणी ग्रामसेवक माणकोले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्याप्रारंभी प्रशासक आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की आपल्या रायगड जिल्ह्यावर अनेक आपत्या येतात अशावेळी नागरिकांनी कोण कोणती दक्षता घ्यावी यासाठी आपल्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण डॉ. जयपाल पाटील यांचे 811 ग्रामपंचायत मध्ये आपत्ती कार्यशाळा सुरू असून याचा लाभ आपणही घेऊन आपल्या शेजाऱ्यांना सांगावे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ग्रामसेविका पूजा पाटील यांचे अभिनंदन ही त्यांनी यावेळी केले. सुरुवातीस महिलांच्या बाळंतपणासाठी 102 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा, यासाठी दूरध्वनी करता पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वाहन चालकस्वप्निल पाटील 102 चे वाहनचालक सोबत श्रीमती राही पाटील, श्री अशोक कोरडे, श्री. सतीश कांबळे हे पोहोचून सुरक्षित बाळंतपणासाठी राही पाटील यांनी माहिती घेऊन सीपीआर कसा द्यावा याचे प्रात्यक्षिक दिले.
उपस्थितांपैकी अंगणवाडी सेविका 3 आणि एक शिक्षिका यांच्याकडे वाहन परवाना नसताना सुद्धा त्या चालवतात हे चुकीचे असून वाहून कायद्याबद्दल रायगड पोलीस वाहतूक शाखेचे श्री. प्रशांत म्हात्रे यांनी नवीन वाहन कायदे व दंडाची माहिती दिली. शेतकऱ्यांना पीक, आंबे नारळ यांच्यावर येणाऱ्या रोगांच्या बाबत श्री प्रकाश बागे कृषी सहाय्यक यांनी माहिती दिली त्याचबरोबर शासनाच्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजनांची माहिती श्रीयुत बागाव कृषी विभाग यांनी दिली. जंगलामध्ये वणवा किंवा आग लागतात, वन खात्याला संपर्क करतात, श्रीमती आकांक्षा खांडव आणि कावेरी दराडे वनरक्षक हजर होऊन जंगलातल्या अगिन बाबत माहिती कावेरी दराडे यांनी दिली. यावेळी डॉ. जयपाल पाटील यांनी बाळंतपणासाठी रुग्णवाहिकेत कसे न्यावयाचे याचे प्रात्यक्षिक चादरी मध्ये व हाताची घडी करून कसे न्यायचे याचे दाखविले, साप व विंचू दंशाच्या वेळी कोणती काळजी घ्यायची याची माहिती दिली.
आपल्या घरातील गॅस सिलेंडर विकत घेताना तो मोजून घ्यावा, चुकून गॅस घराकडे झाला दारे खिडक्या उघड्या करून घरातील जेष्ठांना बाहेर काढावे व गॅस एजन्सीला संपर्क करावा असे सांगितले, घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या औषधांचे डबे वेगवेगळे ठेवावे, शेतावर मारणाऱ्या औषधांच्या बाटल्या पंप हाऊस मध्ये ठेवाव्यात, गावामध्ये पोलिसांची शूटिंग रेंज आहे, हा दिवस व दिनांक ग्रामपंचायतीने गावात दवंडी पेटवल्यानंतर कोणीही शूटिंग रेंजच्या परिसरात आपण व आपली गुरे घेऊन जाऊ नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी श्री. गावडे पोलीस पाटील, कुमारी प्रणाली पाटील आणि श्री. प्रभाकर ढसाळे वायरमन, आशा सेविका अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ग्रामसेविका पूजा पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री. महादेव पाटील गुरुजी यांनी केले.







