आषाढी यात्रा अगोदर नगरपरिषदेवर पुन्हा संकट; बडवेचर झोपडपट्टीतील नागरिक आले रस्त्यावर

आषाढी यात्रा

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : आषाढी वारी तोंडावर आली असताना, पंढरपूर नगरपरिषदेला धक्का देणारी घटना पंढरपूर शहरात घडली. संततधार पडणाऱ्या पावसामुळे , बडवेचर झोपडपट्टी व महापूर चाळ मधील गटारे व ड्रेनेज तुंबून रस्त्यावर होऊ लागली. परिणामी , येथील जनता आक्रमक झाली.

नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेत विरोधात आंदोलन शोधण्याची भाषा करू लागली आहे. या भागाचा नगरपरिषदेकडून आजवर झालेला वनवास कथन करू लागली. येथील जनतेला कायमच साथ देणारे नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी सुमारे 20 वर्ष या भागासाठी कष्ट केले आहे. त्यांच्या प्रयासाने या भागात दोन रस्त्यांच्या कामास मंजुरी मिळाली आहे. असे असतानाही येथील कामे कशी काय रखडली ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. आता येत्या आषाढी यात्रे अगोदर काम पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील नेते मंडळींसह जनतेने दिला आहे.
यावेळी नगरसेवक नागेश यादव, समाजसेवक लोकेश आप्पा यादव, प्रसाद यादव, दत्ता थोरात, विशाल परमार, रोहन खरात,मोहसीन बागवान, संतोष वाघमारे, नवनाथ गायकवाड ,सनी रणदिवे, मल्लेश जाधव ,उमर खाटीक या प्रभागातील आदी महिला भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here