पारोळ्यात तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या
file photo

पारोळा (तालुका क्राईम रिपोर्टर समाधान धनगर) : येथील स्वामीनारायण नगर येथील तरुणाने राहत्या घरी कोणी नसताना छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी १५ जून रोजी रात्री साडेदहा वाजता घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भूषण सुभाष चौधरी (वय ३२, रा. स्वामीनारायण नगर, पारोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा यांच्यासह राहत होता.(केसीएन)दरम्यान, रविवारी तो घरी एकटाच होता. रात्री त्याने राहत्या घरात गळफास लावून घेत स्वतःची जीवनयात्रा संपविली.
कुटुंबीय घरी आले तेव्हा घटना उघड झाली. त्याला तत्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here