शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : असोसिएशन यांच्या वतीने राहता न्यायालयात निमगाव कोराळे येथील भूमिपुत्र व पुणे येथील जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष सरकारी वकील राजेश विजय कातोरे यांचे फौजदारी प्रक्रियेत उलट तपासणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन व चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले
याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील विलास ब्राह्मणे उपाध्यक्ष श्याम डांगे सचिव सतीश थेटे आदीसह विविध वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी त्यांचा राहता बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना विशेष सरकारी वकील राजेश कातोरे म्हणाले की अतिशय सोप्या भाषेत विविध न्यायालयाचे उदाहरणे देऊन वकिलांनी उलट तपासणी कोणत्याही केस मध्ये कशी करावी याची अभ्यासपूर्ण माहिती यावेळी दिली उलट तपासणी विषयी अतिशय सोप्या भाषेत गुन्हा सिद्ध करणे गुन्हा कसे नाकारणे साक्षीदारांना कोणते प्रश्न विचारावे त्यामुळे आरोपीचा बचाव करताना त्याचे निर्देशक व कसे सिद्ध करता येईल त्याबरोबरच साक्षीदार सहकार्य करत नसेल तर त्यासाठी कोणते कायदे कलम आहे या विषयावर देखील मार्गदर्शन करत बलात्कार व पोस्को केस मध्ये संवेदनशील विषयात उलट तपासणी कशी घ्यावी बाजू कशी मांडावी साक्षीदार खरा आहे की तो साक्षीदार ठरवून चुकीची साक्ष देत आहे हे कसे ओळखावे आदीसह विविध महत्वपूर्ण विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले
त्यांच्या या मार्गदर्शनाचा न्यायालयीन कामकाज करताना हे मार्गदर्शक मोठे मोलाचे ठरणार आहे असे मत बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास ब्राह्मणे यांनी व्यक्त केले याप्रसंगी मोठी गर्दी होती यावेळी वकील के डी गाढवे अनिल शेजवळ सुभाष चित्रे अविनाश शेजवळ विलास आसणे प्रवीण कांबळे सागर जपे गोकुळ ठुबे आदींसह महिला वकील उपस्थित होत्या.







