अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान

विद्यार्थ्यांचा सन्मान

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : आदिवासी विकास प्रकल्प धुळे प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील दहावी व बारावीच्या प्रथम ,द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा.अनुदानीत आश्रमशाळा सामोडे यांच्या वतीने.विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष घरी जाऊन विद्यार्थी व पालक यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यात साबरबर्डी येथील १२ वी विज्ञान ची शारदा राजू कामडे , तसेच ज्योती लक्ष्मण बागुल इयत्ता १२ वी कला,साबरबर्डी येथीलच इयत्ता १२ वी कला विभागातील ज्ञानेश्वर काळू महाले व सुनील काळू महाले यांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला. नवापाडा येथील मनीषा प्रकाश भोये १२ वी विज्ञान शाखेत ६४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले, वाकी येथील इयत्ता १२ वी कला शाखेतील जयश्री सुरेश चौधरी या विद्यार्थ्यांनीने वडिलांचे दुःखद निधन काही महिन्यांपूर्वी झाले असतांना कला शाखेत ७१ टक्के गुण मिळवून यश संपादन केले.
सर्व विद्यार्थ्यांचा धुळे प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील व अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य मनेष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.राजेंद्र सोनवणे व इतर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याचा व पालकांचा सन्मान करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here