हरवलेला मोबाईल शोधण्यात देवपूर पोलिसांना यश

मोबाईल

धुळे (जिल्हा प्रतिनिधी दिनेश पवार) : येथील गुलमोहर सोसायटीतील राहणारे दिनेश बाबूलाल पवार यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल शनिवार (दि.७) रोजी हरवल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार (क्र.४६/२०२५) पश्चिम देवपूर पोलीसांनी तपासाला सुरुवात केली.

तपासकामी सपोनी / सचिन कापडनीस यांच्यासह असई/जितेंद्र आखाड़े, पोहेकॉ /मनोज साठे, पोकॉ/सुनिल राठोड, पोकॉ/किरणकुमार सावळे, पोकॉ/अतुल जाधव, पोकॉ/हेमंत पवार यांच्या शोध पथकाने सखोल तांत्रिक तपास करत, CEIR पोर्टलच्या सहाय्याने हरवलेला मोबाईल शोधून काढला.
मोबाईल सापडल्यानंतर दिनेश पवार यांना पोलीस स्टेशनला बोलावून सपोनि कापडणीस व त्यांचे सहकारी पोकॉ अतुल जाधव यांनी त्यांना मोबाईल परत केला. तात्काळ तपास करुन, दिनेश पवार यांनी पश्चिम देवपूर पोलिसांचे आभार मानले.

 

मोबाईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here