भिवंडी-कल्याण मार्गावर कंटेनर पलटल्याने चालकाचा मृत्यू

accident
file photo

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : भिवंडी-कल्याण मार्गावर मंगळवारी (दि.१७) कंटेनर पलटल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. मयत चालकाचे नाव राम लखन चव्हाण (वय ४८, शहापूर) असे आहे. तो भिवंडीकडे येत असताना हा अपघात घडला. कंटेनर रिव्हर्स घेताना मागील बाजू उंच असल्याने वाहन कलंडले आणि पलटले. या अपघातामुळे चालकाचा मृत्यू झाला.

अपघाताने भिवंडी-कल्याण मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी शांतीनगर पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here