शिवसेनेच्या दणक्याने प्रशासनाला आली जाग; गार्डी येथील ओढ्यावरील गैरसोय होणार दूर

गार्डी

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : तालुक्यातील गार्डी येथील ओढ्यातील पाणी पातळी वाढल्याने ग्रामस्थ आणी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ती गैरसोय दुर होण्या संदर्भात जिल्हासंपर्कप्रमुख अनिल कोकीळसाहेब यांच्याशी चर्चा केली.

त्यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक शिष्टमंडळ उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे तालुकाप्रमुख बंडू घोडके. जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रणदिवे शेतकरी सेनेचे शिवाजी जाधव राजाभाऊ पवार आदींनी तेथे समक्ष जाऊन परिस्थितीची पाहाणी करून लघुपाटबंधारे खात्याचे उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद उपविभाग पंढरपूर यांना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रितसर निवेदन देऊन गार्डी येथील ओढ्यावरील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय येत्या काहि दिवसात दुर न केल्यास गार्डी ग्रामस्थ विद्यार्थी व पालक यांना बरोबर घेऊन शुक्रवार दिनांक १९ रोजी रस्ता रोको आंदोलन छेडणार आसल्याचा इशारा दिला होता प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित पावले उचलल्याने दि १९ रोजी घेण्यात येणारे रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

गार्डी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here