ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : “गोविंदा आला रे” या “सरकार राज” चित्रपटातील गाण्यावर स्टंट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील काही युवकांना मोठी किंमत मोजावी लागली आहे.
या व्हिडीओमध्ये मुख्य आरोपी जो काही दिवसांपूर्वी इंदिरा नगर नाका येथील एका महिलेवरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता तुरुंगातून सुटताच गाडीतून स्टंट करतानाचा व्हिडीओ पोस्ट करताना दिसतो. त्याच्यासोबत हेल्मेट न घालता दुचाकीवर मागे चालणारे अन्य तरुणही आढळून आले.
स्टंट प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करा. झोन-५ चे उपायुक्त प्रशांत कदम यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. केवळ दोन तासांत आरोपीचा माग काढून त्याला अटक करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ लक्षात घेऊन संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर वागळे इस्टेट पोलिसांनी लगेचच हालचाल करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आणि भारतीय न्याय संहिता (BNS): कलम 189(2), 190, 270, 281, 285, वाहतूक कायदा: कलम 184, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951: कलम 37(1)(3) आणि 135 कायद्यांनुसार शाहेद रहीम शेख, तौसिफ शेख, इरशाद शेख, समीर शेख, सरफराज शेख, साजिद शेख, इरशाद (पूर्ण नाव प्रतीक्षेत) (सर्व आरोपी अंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे येथील रहिवासी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्टंटसाठी वापरलेली रेड स्विफ्ट कार जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे.







