पंढरपूर (रिपोर्टर तालुका प्रकाश इंगोले) : शहरांमधील रिक्षा चालकावर अचानक आरटीओ चा कारवाईचा धुमधडाका चालू असताना रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. कारवाया चालु असताना एका गरिब रिक्षा चालकाने जुन्या बसस्टँड येथे स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
ही वार्ता पंढरपूर- मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांना समजताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन रिक्षा चालकांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी समजुन घेतल्या आणि लगेच आरटीओ यांना फोन करून रिक्षा चालक यांना न्याय मिळवून दिल्याचे दिसुन आले. आषाढी वारीच्या मुहूर्तावर रिक्षा चालका वर का कारवाया ? असा प्रश्न उपस्थित होत असतान आमदार समाधान आवताडे यांनी या गोर गरिबांना रिक्षा चालकांना ऑन दि स्पॉट न्याय मिळवून दिल्याचे दिसुन आले. आज या निर्णयामुळे आमदार आवताडे यांचे तोंडभरून कौतुक होत आहे. म्हणून जमलेल्या जनतेतुन आमदार आवताडे यांचा आरटीओ ला एक कॉल पंढरपुरातील रिक्षावाल्यांचा प्रॉब्लेम सॉल हा एकच आवाज निघत होता.







