भडगाव (तालुका क्राईम रिपोर्टर अमीन पिंजारी) : कजगाव ता.भडगाव येथील पारोळा रोडवरील शितल लॉन येथे दि.१३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आ.किशोर पाटील यांचे अध्यक्षतेखाली तहसीलदार शितल सोलाट यांचे उपस्थितीत संपन्न झाले
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसुल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्व सामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख व कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यांमधे मंडळ स्तरावर समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन दि.१३ रोजी कजगाव येथे पारोळा रोडवरील शितल लॉन या ठिकाणी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.किशोर पाटील हे होते
सदर शिबिरात पुरवठा विभाग,स.गा. यो, इ.गा.यो,श्रावण बाळ योजना, पं.स भडगाव, पो.स्टे.भडगाव, महाराष्ट्र विज वितरण,ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग,तालुका कृषी विभाग,ग्रामीण रुग्णालय, महिला बाल विकास प्रकल्प, भुमी अभिलेख,सहाय्यक निबंधक, पशु वैद्यकीय,दुय्यम निबंधक,शिक्षण विभाग, इत्यादि विविध शासकीय कार्यालया मार्फत स्टॉल लावण्यात आले होते शिबिरात संबंधित विभागातील शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली लाभार्थ्यांना स्तनदा माता योजने अंतर्गत बेबी केयर किट,७/१२ उतारे,जातीचे दाखले,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, इ केवायसी,नैसर्गिक आपत्ती अनुदान,अंत्योदय योजना,लाभार्थी उत्पन्न दाखले, डोमीसायील,अग्रीस्टक,नान क्रिमिलेयर दाखले व इतर दाखले आ.किशोर पाटील यांचे हस्ते देण्यात आली प्रसंगी कजगाव मंडळ भागातील लाभार्थी, सह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







