बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : दिनांक 13/06/2025 बुलढाणा येथे शासकीय विश्राम गृहावर पालकमंत्री बुलढाणा जिल्हा मकरंद जाधव पाटील आबासाहेब ह्यांच्या समोर नांदुरा येथील 9 जून 2025 रोजी झालेल्या विद्युत अपघाता बाबत चर्चा केली त्यांनी भीम नगर मधील तार काढून एबी केबल टाकणे , शाहीर कॉलोनी मधे सुद्धा तार काढून एबि केबल टाकणे , वार्ड नंबर 1 मधे डीपी बसवणे संबंधित तिन्ही घटना समजून घेत त्वरित काम करण्यासाठी 5 लाख निधी मंजूर करून संबंधित विभागाला निर्देश दिले
त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष शेख अन्वर शेख हाजी बाबा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष डॉ प्रदीप भाऊ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक सुधाकर पाटील साबे ह्यांच्या मागणी नुसार विषय मार्गी लावण्यात आले तसेच नांदुरा तालुका मधील अलंपुर पंचायत समिती सर्कल मधील येरली, नवी येरली, बेलाड, खरकुंडी, पतोंडा, अलंमपुर, आंबोळा, खातखेड, रामपूर, भुईशिंगा इत्यादी गावातील समस्या व विकास कामांबद्दल सविस्तर चर्चा केली व लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी विनवणी केली
त्याच बरोबर दहिवडी जिल्हा परिषद सर्कल मधील विविध विकास कामांबदल चर्चा केली. तालुक्याच्या व शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने तालुका अध्यक्ष दीपक सुधाकर पाटील, विधानसभा अध्यक्ष डॉ प्रदीप भाऊ हेलगे, शहर अध्यक्ष अन्वर भाऊ सोबत माळेगांव ग्रामपंचायत सदस्य अक्षय हेलगे पाटील होते नेहमी प्रयत्नशील राहून सर्व कामे मार्गी लावण्यासाठी मदत करण्यासाठी पालक मंत्री मकरंद पाटील साहेब सदैव तयार भरभरून मदत करतील अशी आशा व्यक्त केली







