जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर कुणाल भावसार) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर योजना २०२५ अंतर्गत जामनेर तालुक्यातील फत्तेपुर महसूल मंडळात ग्रामपंचायत मंगल कार्यालय, फत्तेपुर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात विविध विभागांच्या सहभागातून एकूण ३६९ लाभार्थ्यांना थेट सेवा व लाभ वितरित करण्यात आले. शिबिरामध्ये खालीलप्रमाणे महत्त्वाच्या सेवा प्रदान करण्यात आल्या: संजय गांधी निराधार योजना – DBT प्रक्रिया लाभार्थी: १७०, ॲग्रीस्टॅक नोंदणी: ०५, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत सेवा: ३९, पुरवठा विभाग (शिधापत्रिका वाटप): १०७, सेतू केंद्रामार्फत विविध दाखले प्रदान – उत्पन्न दाखले: १६, जातीचे दाखले: १४, वय, अधिवास व रहिवास दाखले: १८
यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दारातच सरकारी सेवा मिळाल्या असून, शासनाच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून शिबिराची उपयुक्तता अधोरेखित झाली.







