भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्र.१०४ यांच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम

भारतीय जनता पार्टी

मुंबई (उपसंपादक कायदेशीर सल्लागार ॲड. चंद्रशेखर आठल्ये) : आज (दि.१४) कै. बारकू पाटील उद्यान, मुलुंड (पश्चिम) येथे भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्र.१०४ यांच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदरहू कार्यक्रम नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे याच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई हाऊसिंग फेडरेशनतर्फे आयोजित केला होता त्यावेळी के. राजकुमार नाडार, जिगर चंदे, प्रकाश मोटे, मध्य मुलुंड विधानसभा अध्यक्ष सौ. पूजा सीनारी, वॉर्ड क्र.१०४ अध्यक्ष अभिजीत साबळे, श्री प्रशांत सिनारी, प्रकाश जाधव, सौ. सानिका चव्हाण, सुनील टोपले, अभिजीत ढोमसे, अशोक सावंत,अशोक ठक्कर, परेश सोमय्या, दिनेश जयस्वाल, सौ जयश्री बेलेगार, दिलीप चौधरी आणि इतर मानेवर उपस्थित होते.
यावेळी अहमदाबाद येथील विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलुंडच्या रहिवासी असलेल्या श्रद्धा धवन तसेच इतर दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here