सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला मौजे वाडेगाव येथे फिरती करत असताना विनापरवाना कोळसा वाहतूक मालकी शेतात ट्रॅक्टर क्रमांक MH10, DL, 7170, कोळसा पोथी 18. विनापरवाना वाहतूक होत असल्यामुळे वन विभागाचा वाहतूक परवाना पास नसल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली कोळसा गालासह जप्त केला.
वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांचा प्रथम गुन्हा क्रमांक 1/2025 नोंद केला. आरोपी विवेक बसंत शिंदे राहणार वाडेगाव व इतर पाच व्यक्ती यांच्यावर बन गुन्हा नोंद केला. कोळसा पोती 95 बाजार भाव किंमत अंदाजे 60000. रुपये आहे. सदरचा ट्रॅक्टर ट्रॉली कोळसा मालासह जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला कार्यालयाजवळ ठेवण्यात आला वन परिक्षेत्र अधिकारी सांगोला मौजे मेडसिंगी येथे फिरती करत असताना मालकीच्या क्षेत्रात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कोळसा पोती 108 अवैध्य वाहतूक करण्यासाठी भरून ठेवली होती ट्रॉली सह कोळसा पोती 108 जप्त केली वन विभाग वाहतूक परवाना नसल्यामुळे कारवाई केली
आरोपी विवेक वसंत शिंदे राहणार वाडेगाव व इतर पाच व्यक्तीवर वन गुन्हा नोंद केला. वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांचा प्रथम गुन्हा क्रमांक ओ-02/2025 सहा व्यक्तीवर उप गुन्हा नोंद केला. सदरचे कोळसापोती 108 बाजार भाव किंमत 71000/हजार रुपये होईल रिलीव्ह कोळसा मालासह जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सांगोला कार्यालय जवळ ठेवली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला वनपाल जुनोनी वनरक्षक घेरडी सर्वजण मौजे डिकसळ परिसरात फिरती करत असताना ट्रॅक्टर नंबर एम एच 45 ए 5660. मध्ये कडुनिंब इमारती नग 20 त्याचे घ.मी 3.916 आहे. विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले. वन विभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना नसल्यामुळे ट्रॅक्टर लाकूड माला सहज जप्त केले
वनरक्षक घेरडी यांचा प्रथम गुन्हा क्रमांक 01/2025 नोंद केला आहे. आरोपी सचिन संभाजी गावडे इतर तीन चार व्यक्तीवर वन गुन्हा नोंद केला आहे. जप्त लाकूड मालाची बाजारभाव प्रमाणे किंमत 25000 हजार रुपये आहे. वन परिक्षेत्र अधिकारी सांगोला दिनांक 17 /6/2025 रोजी मोजे काढलास मानेगाव हातीद परिसरात रात्री 10.30च्या दरम्यान रात्री गस्त करत असताना वाहनांची तपासणी केली असता टाटा आयशर एमएच ४५ ००३५ त्यामध्ये कडुलिंब चिंच प्रजातीचे जळावू लाकूड 21.42 घन मीटर अवैध दिसून आले वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना नसल्यामुळे आरोपी सागर नारायण काशीद राहणार कडलास व इतर एक त्यांच्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी प्रथम गुना क्रमांक 3/2025 नोंद केला आहे. सदरचा टाटा आयशर लातूरमालासह जप्त करू वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला जवळ ठेवला आहे.
पुढील तपास चालू आहे लोकांना आवाहन करण्यात येत आहे की मालकी क्षेत्रातील झाडे विनापरवाना वृक्षतोड केल्यास व विनापरवान वाहतूक केल्यास व वन्य प्राणी शिकार केल्यास वनक्षेत्रात अतिक्रमण केल्यास वन क्षेत्रामध्ये वृक्षतोड केल्यास व इतर कोणत्याही प्रकारचा वन गुन्हा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. सदरची कारवाई मुख्य वनरक्षक प्रादेशिक पुणे एन आर प्रवीण मा. उपवन रक्षक पुणे महादेव मोहिते अतिरिक्त कार्यभार सोलापूर सहाय्यक संरक्षक सोलापूर कॅम्प विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम विठ्ठल जाधवर तसेच वनपाल सांगोला वनपाल जुनोनी वनरक्षक घेरडी वनरक्षक सांगोला वनरक्षक मोहोळ बु. यांनी केली







