ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

ज्ञानदीप

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : ज्ञानदेव बाल संस्कार भारती व पूर्व प्राथमिक विद्यालय मंगळवेढा येथे शैक्षणिक वर्ष 2025 -26 च्या पहिल्या दिवसाची सुरुवात 16 जून रोजी ढोल ताशांच्या गजरात व आनंदी वातावरणात नवागत विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले

कार्यक्रमाची सुरुवात भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व विद्येचे देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सचिव सिद्धेश्वर सलगर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शाळेच्या शिक्षकांनी आपापल्या वर्गाची फुले पथके सुंदर फलक लेखन रांगोळी सेल्फी पॉईंट इत्यादी उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजावट करण्यात आली होती.
यानंतर संस्थेचे सचिव सिद्धेश्वर सलगर ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना सलगर यांच्या हस्ते नवागत विद्यार्थी विद्यार्थिनींचे व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आला अशा प्रकारे शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंद होतोय मोठे उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान घोडके यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अकिब मुजावर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here