भडगाव (तालुका क्राईम रिपोर्टर अमीन पिंजारी) : कजगाव तालुका भडगाव येथून जवळच असलेले गोडगाव येथे १७ जून दुपारी बारा वाजेच्या सुमारास चिलखान जवळील शेतात एक युवक म्हशी चारत असताना कजगाव वाडे शिवारालगत जाणाऱ्या थ्री फेज विद्युत प्रवाह करणारे तारांचा शॉट सर्किट होऊन अचानक तार तुटल्याने शेतात चरत असलेल्या म्हशींच्या अंगावर पडली असता दोन म्हशींचा जागी मृत्यू झाला.
म्हशी चारणारे शेतकरी या ठिकाणी बालंबाल बचावले आहे, गोडगाव येथील नामदेव रामचंद्र पाटील यांच्या मालकीची अंदाजे 80 हजार रुपये किमतीची व शरीर मुसा शेख यांची एक लाख रुपये किमतीची म्हैस जागीच ठार झाल्याने पशुधन मालकाचे मोठे नुकसान झाले आहे, दोघी पशुधन मालकाने व्याजाचे पैसे काढून म्हशी घेतल्या होत्या, गरीब पशुधन मालकांना मोठा फटका बसला आहे तरी महावितरण कंपनीने आपत्कालीन निधीतून मदत द्यावी अशी मागणी पशुधन मालकांकडून होत आहे.







