बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : बुधवारी (दि.१८) नांदुरा पोलिसांना गोसेवा समितीचे सदस्य उद्धव नेरकर यांनी माहिती दिली कि मलकापूर वरून ३ ट्रक आईसर गाड्यामध्ये वाहतुक क्षमतेपेक्षा जास्त गोवंश ज्यात गाय, बछडे हे जबरजस्तीने कोंबून वाहतूक करीत आहेत.
त्यावरून नांदुरा पोलिसांनी मलकापूर नाक्यावर नाकाबंदी करून 3 गोवंश वाहतूक करणारे ट्रक पकडले असता त्या 3 ट्रक मध्ये 42 गायी व 17 बछडे एकूण 59 गोवनश हे बिनापरवाना निर्दयीपणे वाहतूक करताना कमी जागेत लहान दोराने बांधून, कोणतेही अन्न पाणी सुरक्षा न देता, मार लागून जखमी झाल्याचे दिसून आलेत. त्यावरून नांदुरा पोलिसांनी ते गायी बछडे हे अन्नपाणी व उपचार निवाराकरिता महादेव गोरक्षण संस्था आमसरी येथे दाखल केले.
4 आरोपीना अटक करून 3 ट्रक 59 गोवंश असा एकूण 38.91.000रुपयांचा गोवानशाचा मुद्देमाल नांदुरा पोलिसांनी जप्त केला आहे व फिर्यादी अनिल गोराने यांच्या तक्रारी वरून 4 आरोपीविरुद्ध प्राण्यांना निर्दयीते ने वागविणे कलम 11. मोटार वाहन कायदा कलम 66+192 कलमनवये गुन्हा दाखल करनेत आलेला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक विलास पाटील, सपोनि जगदीश बांगर, PSI इंगळे बाबा,ASI जवंजाळ, HC मुंजाळ, कैलास सुरडकर, अनिल गोराणे पंकज डाबेरावं, रवी सावळे शकील तडवी यांनी आज नांदुरा येथे केलेली आहे.







