पिंपरी चिंचवड भागात १ गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त

गावठी पिस्तुल

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : मंगळवार (दि.१७) म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखा युनिट ३चे पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोहवा आढारी, पोहवा सोनवणे, पोशि मेरगळ, पोशि जैनक, पोशि बाळ सराफ पाहिजेत आरोपीचा शोध घेत होते.

त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं. ६५६/२०२४ भादंवि ३२४ या गुन्हामधील गेल्या एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी शुभम सोमेश्वर मुंगडे (वय २०, रा.कडाचीवाडी, ता.खेड, जि.पुणे) याला निघोज येथून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता १ गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुले आढळून आली.
सदर आरोपी विरुध्द पोशि रामदास यशवंत मेरगळ यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं ३८४/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोहवा आढारी, पोहवा सोनवणे, पोहवा मोरे, पोशि मेरगळ, पोशि जैनक, पोशि बाळ सराफ, पोशि काळे, पोहवा नागेश माळी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here