नागपुरात ग्रामपंचायत सदस्याचा चाकूचे २५ वार करुन निर्घृण हत्या

निर्घृण हत्या
File Photo

नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, आत्महत्या यांसारखे प्रकार समोर येत आहेत. असे असताना पिपळा डाकबंगला येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील (वय 32) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि.१६) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अतुल पाटील हा मध्यरात्री एनएच-47 मार्गावरील सावनेर रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करून परतत होता. पिपळा डाकबंगला येथे परतत असताना आरोपी हिमांशू कुंभलकर (वय 19) याने त्याला थांबवले. त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला गाडी घेऊन पुढे पाठवले आणि ‘आम्ही दोघे मागून येतो,’ असे सांगितले. यानंतर हिमांशु कुंभलकर याने धारदार शस्त्राने अतुल पाटील यांच्यावर अचानक हल्ला केला. तब्बल 25 वेळा चाकूचे घाव घालून तसेच भिंतीवर डोके आपटून क्रूरपणे हत्या केली. यामध्ये अतुल पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, तपासात या हत्येचा मुख्य सूत्रधार पिपळा डाकबंगला ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू कोकड्डे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी हिमांशू कुंभलकर व विष्णू कोकड्डे या दोघांना ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here