धुळे गुन्हे शाखेने केली गोवानिर्मित ४१ लाखांची दारू जप्त

crime
File Photo

धुळे (जिल्हा प्रतिनिधी दिनेश पवार) : गोवा राज्य निर्मित दारूची गुजरात राज्यात वाहतूक होत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांच्यासह पथकाने पाठलाग करून केलेल्या कारवाई ४१ लाखांची दारू जप्त करण्यात आली. चालकासह दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना गोवा राज्यातील दारूची गुजरातकडे वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नगावजवळ नाकाबंदी करण्यात आली. १७ रोजी नऊ वाजता संशयीत वाहन (एम.एच.१३ डी.क्यू.९६६५) आल्यानंतर तिची तपासणी केली असता त्यात राज्यात विक्रीला प्रतिबंध असलेली गोवा निर्मित दारू आढळली. ४१ लाख चार हजार रुपये किंमतीची दारू व २२ लाख रुपये किंमतीचा ट्रक मिळून ६३ लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुधाकर राजाराम माने (वय ५०, साखराळा, ता.वाळवा, जि.सांगली) व विनायक शिवाजी सपताळे (वय २६, रड्डे, ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, प्रशांत ताकाटे, संजय पाटील, पवन गवळी, आरीफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, कॉन्स्टेबल मयूर पाटील आदींच्या पथकाने केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here