अल्पसंख्यांक विकास मंडळ जळगाव जिल्हाअध्यक्षपदी मुराद पटेल यांची निवड

अल्पसंख्यांक

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : चाळीसगाव-येथील खडकी बुद्रुक चे माजी उपसरपंच पत्रकार मुराद इब्राहिम पटेल यांची अल्पसंख्यांक विकास मंडळ जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली

अल्पसंख्यांक विकास मंडळ ही सामाजिक संघटना असून पूर्ण राज्यात ह्या मंडळचे सामाजिक नेतृत्व चळवळ संस्थापक अध्यक्ष व प्रदेश अध्यक्ष शोएबभाई खाटीक यांच्या मार्गदर्शनाने सुरु असते राज्यकार्यकारणी झाल्यावर राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष यांची निवड करण्यात आली यात जळगाव जिल्हा अध्यक्षपदा साठी मुराद इब्राहिम पटेल यांची निवड प्रदेश अध्यक्ष शोएबभाई खाटीक यांनी केली आहे लवकरच मुराद पटेल हे जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यावर तालुका अध्यक्ष यांची कार्यकारणी जाहीर करणार आहे अशी माहिती मुराद पटेल यांनी बोलतांना सांगितले या निवडी बद्दल जिल्ह्यातून व चाळीसगाव तालुक्यातून व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, व भ्रमनध्वनी वरून नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
माजी खासदार उन्मेष पाटील माजी आमदार राजीव दादा देशमुख, पारोळा नगरपरिषद माजी नगराध्यक्ष करण पवार पाटील सह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अल्पसंख्यांक विकास मंडळ संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएबभाई खाटीक यांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे मी नक्कीच संघटन मजबूत करण्याचे काम करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here