२० वर्षीय मुलीवर १० जणांचा सामूहिक बलात्कार

gangrape
File Photo

भुवनेश्वर (ओडीशा) (वृत्तसंस्था) : राज्यातील गोपालपूर या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर २० वर्षीय युवतीवर तिच्या प्रियकरासमोरच सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या घटनेत आता ४ अल्पवयीन आणि १० आरोपींना अटक केली आहे. अत्याचाराची घटना रविवारी संध्याकाळी घडल्याचे समोर आले आहे.

२० वर्षीय युवती जवळील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. ती युवती आपल्या प्रियकरासोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती. तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ते दोघेही समुद्रकिनाऱ्यावर एका निर्जन ठिकाणी बसले होते. त्याच वेळेस त्या दोघांना १० जणांच्या टोळीने घेरले. त्यानंतर त्यांनी तिच्या प्रियकारला पकडून ठेवले. त्यानंतर १० जणांनी त्या युवतीवर आळीपाळीने अत्याचार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सर्वात प्रथम ७ जणांना चौकशीसाथी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सर्व १० आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपी दुसऱ्या राज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
ज्या ४ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे त्यांना अल्पवयीन समजून निर्णय देण्यात यावा अशी पोलिस कोर्टाला विनंती करण्याची शक्यता आहे. पीडित युवतीची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पीडित तरुणी अन्य तीन मुलींसह एका हॉस्टेलमध्ये राहत असल्याचे समजते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here