मोहोळ (प्रतिनिधी) : अर्जूनसोंड पाटी ( ता मोहोळ ) येथील आर्यन लॉजच्या नावाखाली चालू असलेल्या कुंटनखाण्यावर पोलिसांनी धाड टाकून एक पिडीत महिलेची सुटका करून दोघांना अटक केली.
याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड पाटी येथील आर्यन लॉज येथे कुंटनखान्या प्रमाणे महिलांचा वापर केला जातो, अशी खबर पोलिसांना मिळाली होती यानुसार सुरेखा अशोक शिंदे वर्षे ३१, पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक – महिला सुरक्षा शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण. यांच्या पथकाने याठिकाणी धाड टाकली.
यावेळी एक पिडीत महिले कडून तिला पैशाचे आमीष दाखवून तिच्या कडून वेशा व्यवसाय करवून घेतला जात होता. तीची पोलिसांनी मुक्तता केली तर आर्यन लॉजचा मॅनेजर पंकज भास्कर पवार वय २९ वर्षे राहणार ढोकबाभूळगाव, लॉजचा वेटर रामचंद्र पांडुरंग भालेराव वय ३५ रा अण्णाभाऊ साठे नगर मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांचेवर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3,4,5,6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.







