सोनके येथील श्रीनाथ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिन

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : जिल्ह्यातील सोनके येथील श्रीनाथ विद्यालयात शनिवारी (दि.२१) आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो.

मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. यावेळी योगाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. योगाचे विविध प्रकार विद्यार्थी व शिक्षक यांनी केले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश इंगोले, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here