माथेरान घाटामध्ये पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात

माथेरान

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दैवबलवत्तर म्हणून यातील सात प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. घाटातील पीटकर पॉईंट येथील अवघड वळणार चालकाचे नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार थेट रस्त्याची सुरक्षा रेलिंग तोडून खोल दरीच्या बाजूस म्हणजेच रस्ता आणि खोल दरीच्या मध्ये हेलकावे खात अडकून राहिले.

ठाणे जिल्ह्यातील बालकुम येथील राहणारा वाहन चालक सूरज येसले हा परिसरातील सहा पर्यटकांना वाहन कारमध्ये बसून भाडे म्हणून घेऊन आला होता. सकाळी सूरज हा माथेरान घाट चढण्यासाठी म्हणून नेरळ येथून सुरुवात केली होती. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वॉटर पाईप या रेल्वे स्थानकाच्या जवळील असलेल्या पिटकर या अवघड वळणावर घाट चढायला सुरुवात केली. त्याचवेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here