बेंडाळे चौकातील चंद्रिका सॉ मिलला भीषण आग

चंद्रिका सॉ मिल

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आज (दि.२६) सकाळी शहरातील बेंडाळे चौक ते नेरी नाका दरम्यान असलेल्या चंद्रिका सॉ मिल (वखार व दुकान) येथे गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. यामुळे वखारीतील लाखो रुपये किमतीचे लाकूड, दुकानातील साहित्य, फर्निचर आणि इतर वस्तू जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आगीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताच, सुरुवातीला दोन अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here