मुंबई (कुलाबा प्रमिला जाधव) – वेद फाउंडेशन अध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मुंबईतील विविध पोलिस स्टेशन मधील पोलीस अधिकाऱ्यांना आरोग्य व प्रकृती स्वास्थ्य हितकर प्रसाधने वितरित केली. या उपक्रमांतर्गत मालाड स्थित पोलिस स्टेशन मधील अधिकाऱ्यांना प्रसाधने वितरीत करून कार्यारंभ करण्यात आला.







