वेद फाउंडेशन द्वारा स्वातंत्र्य दिन व पश्चात पर्यावरण पूरक सामाजिक उपक्रमाचे आयोजन

मुंबई (कुलाबा प्रमिला जाधव) – वेद फाउंडेशन द्वारा स्वातंत्र्य दिन व पश्चात पर्यावरण पूरक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या टाळेबंदीमुळे व्यक्ती घराबाहेर जास्त वेळ व्यतीत करू शकत नाही. त्यामुळे या स्वातंत्र्यदिनी औषधी किंवा खाद्य वनस्पती, घरी आणून त्याचे संगोपन करावे असे आवाहन वेद फाउंडेशन या संस्थे मार्फत करण्यात आले होते. सदर आवाहनास प्रतिसाद देत डॉक्टर वैभव पाटील, केशव मस्के, नंदकुमार मरवडे, कल्पेश पवार, विलास देवळेकर, प्रमिला जाधव, मंजू सराठे, कल्पना शिंदे, रश्मी सराठे, प्रकाश केणी, चंद्रशेखर मात्र्हे, रश्मी जोशी अनंत मोरे इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी बीजारोपण तथा वृक्षारोपण करत आपला सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here