जम्मू (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या उधमपूर येथे भारतीय लष्कराला मोठे यश प्राप्त झाले आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपुर येथे भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आहे आहे. लष्कराचे ऑपरेशन अजूनही सुरूच आहे. संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे.
भारतीय लष्कराच्या पथकाला या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार, भारतीय लष्कराच्या पथकाने आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली. उधमपुर परिसरात जैशचे चार ते पाच दहशतवादी लपले असल्याची माहिती प्राप्त होताच या परिसराला वेढा घालण्यात आला.
Op BIHALI
Based on specific intelligence, a joint operation was launched by #IndianArmy and @JmuKmrPolice in the Bihali area of #Basantgarh.Contact has been established with #terrorists. The #operation is currently in progress.@adgpi@NorthernComd_IA pic.twitter.com/bEbi8O0bu1
— White Knight Corps (@Whiteknight_IA) June 26, 2025
भारतीय लष्कराने आणि पोलिसांनी जम्मू काश्मीरच्या उधमपुरमध्ये ‘ऑपरेशन बिहाली’ सुरू केले होते. सर्च ऑपरेशन सुरू असतानाच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत एक दहशतवादी ठार मारण्यात लष्कराला यश आले आहे. सर्च ऑपरेशन जवळपास ६ तासांपासून सुरू आहे. ऑपरेशन अजूनही सुरूच आहे.







