आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकणा-या तिघांना अटक

arrest
File Photo

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : आरे कॉलनीतील जंगलात रस्त्यालगत बेवारस सापडलेल्या वृद्ध महिला यशोधरा गायकवाड (वय ७०) यांचे सत्य अखेर शोधून काढत मुंबई पोलिसांनी तिच्या नातवासह दोघांना अटक केली. आजींवर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान चौकशी करता आजी कुणालाही न सांगता घराबाहेर पडल्याच्या नातवाने दावा केला होता. मात्र या दाव्यावर मुंबई पोलिसांना संशय आला. कारण ती वृद्ध महिला ज्या अवस्थेत पोलिसांना सापडली होती, त्यात ती एकटी मालाडहून आरेच्या जंगलात पोहोचण शक्यच नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. अखेर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजनं नातवाचा खोटारडेपणा पोलिसांनी उघड झाला. या फुटेजमध्ये घटनेच्या त्या दिवशी नातू अन्य दोघांच्या मदतीनं आजीला एका चादरीतून उचलत रुग्णालयातून बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर पोलिसांनी नातवाला इंगा दाखवल्यावर सगळा प्रकार समोर आला.
आजीची तब्येत कॅन्सरमुळे दिवसेंदिवस खालावत चालली होती. तिच्यावर २४ तास लक्ष देणं कठीण झालं होतं. घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं आजीवर उपचार करणे शक्य नव्हते. त्यामुळे अखेर रोजच्या त्रासाला कंटाळून नैराश्येच्या भरात हे कृत्य नातवानं केल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती आरे कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ५० हून अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर नातू सागर शेळके, त्या आजीचा दीर आणि रिक्षावाला यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. आरे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here