धुळ्याजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर धावत्या बसला भीषण आग

भीषण आग

धुळे (जिल्हा प्रतिनिधी दिनेश पवार) : तालुक्यातील देवभाने परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर इंदोरकडे जाणा-या खाजगी बसला अचानक आग लागली. सुरुवातीला बसच्या टायरला आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या घटनेमुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here