वसाका सुरु करण्यासाठी कामगारांचा बॅंकेसमोर बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा

वसाका
वसाका कामगारांचे थकीत वेतन मिळावे तसेच कारखाना सुरु करण्यात यावा या मागणीसाठी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देताना कुबेर जाधव, शशीकांत पवार नानाजी पवार, दोधा पवार, अण्णा गुंजाळ, व इतर.

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : येत्या पंधरा दिवसांत राज्य शिखर बँकेने वसाका चालू करण्या संदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा बँकेच्या नाशिक कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा देत कामगारांनी सुरू केलेले आमरण उपोषण बुधवार (ता.२५) रोजी सायंकाळी मागे घेतले. यावेळी शेकडो कामगार, महिला, तसेच सभासद उपस्थित होते,

वसंतदादा सहकारी साखर कारखाना सुरू करावा, मागिल थकित देणं मिळावं यासाठी बुधवार ता.२५ रोजी देवळा शिवस्मारकाजवळ कारखान्यातील आजी माजी कामगार, महिला व सभासदांनी आमरण उपोषण केले. मागील आठवड्यातही काही मोजक्या कामगारांनी देवळा येथे शिवस्मारकाजवळील पायऱ्यावर मुंडण करून लक्षवेधी धरणे आंदोलन केले होते.स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवत दुर्लक्ष केल्याने कामगार, महिला,व परिसरातील सभासदांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते, सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेल्या उपोषणस्थळी शेकडो कामगार महीला उपस्थित होते,देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, बागलाणचे मा आमदार संजय चव्हाण, बाजार समिती संचालक भाऊसाहेब पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट,उस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, शे,का,प,चे जेष्ठ नेते भाई दादाजी पाटील, शेतकरी संघटनेचे बागलाण तालुका अध्यक्ष केशवराव सुर्यवंशी, व्यंगचित्र कार किरण मोरे, रविंद्र शेवाळे,रामक्रुष्ण जाधव,भास्कर बागुल, देवळा तालुका माणिक निकम, युनियन उपाध्यक्ष दीपक पवार, कैलास कोकरे, बंडु आढाव, जेष्ठ सभासद पुंजाराम आहिरे जगदीश पवार, भाऊसाहेब मोरे आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

आज शेकडो कर्मचाऱ्यांनी देवळा येथील शिवस्मारकाच्या शेजारी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते,जो पर्यंत वसाका सुरू केला जात नाही तोपर्यंत कामगाराचा लढा सुरूच राहील, येत्या १५ दिवसांत कारखाना सुरू करण्याच्या बाबतीत निर्णय घेतला नाही तर शिखर बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या गेटवर बिराड मोर्चा काढला जाईल त्यात कामगाराबरोबर शेकडो सभासदांचाही सहभाग असेल,,
– कुबेर जाधव,
समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना

वसाकाची पाचशे कोटींची मालमत्ता कर्जाच्या खाईत अडकल्याने धूळखात पडली, भिंतींना भगदाडं पडुन चोऱ्या साऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, सभासद व कामगारांचे थकीत वेतनही रखडले आहे. गेल्या एकवीस महिन्यांपासून बंद असलेल्या कारखान्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा कारखाना पुन्हा सुरळीत चालू व्हावा व थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी जमिन धारक शशीकांत पवार, कामगार संघटनेचे माजी कार्याध्यक्ष, तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव, जमिन धारक शेतकरी नानाजी पवार, दोधा पवार, अण्णा गुंजाळ, निंबा निकम, समाधान निकम, सुनिल आहीरे, संजय देशमुख, विनायक जाधव, गणु शिंदे, बापू देशमुख, शरद अहिरराव,सुभाष पवार , सुभाष निकम, वसंत निकम,राजु निकम, महेंद्र आहेर, संजय सावळे, दिलिप देशमुख, दिनकर मोरे, कैलास सोनवणे, सुनिल देवरे, अतुल आहेर, विनोद देवरे, विलास मेधने त्र्यंबक पवार, रामा पवार, कौतिक दळवी,फौजी दिपक झाल्टे,आदीसह सभासद वशकडो कामगार तसेच महिला उपोषणास बसले होते. यावेळी सभापती योगेश आहेर, उस उत्पादक संघर्ष समितीचे प्रभाकर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव,प्रहारचे गणेश निबांळकर,मा आ, संजय चव्हाण यांनी सर्व मतभेद विसरून कारखाना सुरू करावा असे विचार मांडले. सायंकाळी पाच वाजता देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी कामगारांच्या विविध मागण्यांच्या बाबतीत मा जिल्हाधिकारी यांना तात्काळ निवेदन दिले जाईल, तसेच शिखर बँकेच्या प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असे आस्वासन मिळाल्या नंतर सर्व कामगारांनी एकजूट दाखवत तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमुख उपोषण कर्ते ्शशिकांत पवार व कुबेर जाधव यांना निंबु पाणी देउन आमरण उपोषणाची सांगता झाली,शिखर बँकेने येत्या पंधरा दिवसात कारखाना सुरू करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा कामगार बँकेच्या कार्यालयावर बिर्हाड मोर्चा काढतील व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा पवित्रा घेत तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर करून उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणस्थळी मोठ्या संख्येने कामगार व सभासद उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here