नाशिक (उपसंपादक संतोष रायचदे) : जिल्ह्यातील मालेगाव शहरातील छावणी पोलीस ठाणे हद्दीत जुना आग्रा रोड परिसरातील सुजन टॉकिजचे आवारात मोकळे जागी एक २५ वर्षीय युवकाचा मृतदेह गुरुवारी (दि.२६) आढळुन आला होता. सदरचा मृतदेह हा युवक नामे अमोल मोहन निकम, वय २५, रा. एकता नगर, गवळीवाडा, मालेगाव याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. यातील मयतास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी रूमालाने ( गमछाने) गळा आवळून जिवे ठार मारले म्हणुन मालेगाव छावणी पोलीस ठाणेस गुरनं १६९/२०२५ भा. न्या. सं. कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांनी सदर घटनेचा आढावा घेवुन नमुद खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी तपास पथकांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून यातील मयत इसम नामे अमोल मोहन निकम, वय २५, रा. एकता नगर, गवळीवाडा, मालेगाव याचे दैनंदिन कामकाज व राहणीमानाबाबत गुप्त बातमीदारांकडे माहिती घेतली. घटनेच्या दिवशी सायंकाळचे सुमारास मयत हा एका मोटर सायकलवर बसुन गेला असल्याचे समजले होते तसेच मयत हा शेवटचा कोणास भेटला याबाबत सविस्तर माहिती घेवुन, तपासाची चक्रे फिरवुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संशयीत नामे विशाल मारूती गवळी, वय ३८, रा. एच. पी. गॅस गोडाऊन समोर, कैलास नगर, मालेगाव यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन वरील खुनाचे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, यातील मयत अमोल निकम याने आरोपी विशाल गवळी यास शिवीगाळ करून आप-आपसात वाद झाल्याचा राग मनात धरून, भगव्या रंगाचे रूमालाने ( गमछाने) मयताचा गळा आवळून जिवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपीस गुन्हयाचे पुढील तपासकामी मालेगाव छावणी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले असुन पुढील तपास चालु आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सचिन धारणकर, गोरक्षनाथ संवत्सरकर, शरद मोगल, गिरीष निकुंभ, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, संदिप राठोड, विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.







