खडकीत टेम्पोच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

accident
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना खडकीतील सर्वत्र विहार भागात घडली. आईजा शेख असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

याबाबत तिची आई झेबा शाहिन जाहिद शेख (वय २५, रा. सर्वत्र विहार, एम. ई. एस. काॅलनी, लेबर कॅम्पसमोरील रस्ता, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी (२६ जून) दुपारी बाराच्या सुमारास आईजा शेख ही घरासमोर खेळत होती. त्यावेळी तेथून निघालेल्या भरधाव टेम्पोच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाे चालकाचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पटेल तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here