नांदुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा विमल गुटखा आणि बोलेरो पिकअप जप्त

विमल गुटखा

बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : नांदुरा पोलीस स्टेशनच्या डिबी टीमने धडाकेबाज कारवाई करत शहरातील नामांकित गुटखा व्यापारी अमोल जैन यांच्या गोडाऊनवर छापा टाकून शासनाने प्रतिबंधित केलेला विमल गुटखा जप्त केला. ही कारवाई ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बालाजी नगर येथील गोडाऊनमध्ये विमल ब्रँडचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर डिबी पथकाने छापा टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. यासोबतच एक बुलेरो पिकअप वाहन देखील ताब्यात घेण्यात आले आहे, जे या अवैध गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते.
शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा करून त्याची वाहतूक आणि विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी पुढील तपास नांदुरा पोलीस स्टेशनमार्फत सुरु आहे. कारवाईदरम्यान संपूर्ण माल पोलिसांनी जप्त केला असून, आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे नांदुरा शहरातील गुटखा माफियांना मोठा इशारा मिळाला असून, पोलीस प्रशासनाच्या या तात्काळ आणि कठोर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here