सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : मोटरसायकल चोरी करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई आरोपीकडून 5 लाख 68 हजार रुपये किमतीच्या एकूण नऊ मोटरसायकली जप्त केल्या. पंढरपूर शहर परिसरातील ज्या ठिकाणी मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणचे घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवून गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने मोटरसायकली चोरीबाची माहिती काढण्याचे काम सुरू होता.
गोपनीय बातमीदाराकडून एक बातमी मिळाली की पंढरपूर शहरांमध्ये बाहेर गावावरून काही आरोपी चोरी करण्याकरता येत आहेत त्यांची नावे 1)गणेश बाळासो जाधव राहणार जाधव वाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर .2) विकास महादेव पवार राहणार व्हावी रुई तालुका इंदापूर जिल्हा पुणे सध्या वाडी नंबर 2 माळशिरस जिल्हा सोलापूर.3) सुरज नाना पवार राहणार वालचंद नगर रोड कळम तालुका इंदापूर.4) अतुल बाळू तुपे राहणार इंदिरानगर कळम तालुका इंदापूर जिल्हा पुणे.5) ओंकार आनंद वाघमोडे राहणार 61 फाटा माळशिरस जिल्हा सोलापूर असे नावे कळाले वरून सदर आरोपी यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने एकूण आठ गुन्ह्याची कबूल केली आहे. सदर आरोपीकडून सखोल चौकशी केली असता. आरोपीने पंढरपूर शहरात गुन्हे दाखल असलेल्या भाग ,५ गुरनं ,१)गुरनं ४७८/२०२४भा.न्या.स,२०२३ चे कलम ३०३(२) गुरनं२३/२०२५भा.न्या सं२०२३ चे कलम ३०३(२)३) गुरनं २५/२०२५भा.न्या स.२०२३ चे कलम ३०३(२),४)गुरनं३१३/२०२५भा.न्या.सं२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे ५)गुरनं४१८/२०२५भा.न्या.सं२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे ६)गुरनं४२०/२०२५भा.न्या.सं२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे ७)गुरनं४२१/२०२५भा.न्या.सं२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे) ८)गुरनं ४२१/२०२५भा.न्या.सं२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोह३६४ पाटील ,पोह३९८ शिरमा गोडसे, पोह२२१ प्रसाद औटी, पोह १७८९ सचिन हेंबाडे, पोह१२५५ विठ्ठल विभुते, पो कॉन्स्टेबल ३१ कपिल माने, पो कॉन्स्टेबल १९०४ निलेश कांबळे, पो शि.१२१६ शहाजी मंडले,पो शि.२१९० समाधान माने, पो. कॉन्स्टेबल १५१३ बजरंग बिचुकले, पो कॉन्स्टेबल.१३०४ दीपक नवले, पो कॉन्स्टेबल.८०१ धनाजी मुटकुळे, तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल ११८२ रतन जाधव यांनी केली आहे.







