पारोळा (तालुका क्राईम रिपोर्टर समाधान धनगर) : पारोळ्यात आरोग्यदुत म्हणून ज्यांची ओळख असलेल्या म्हणजेच ईश्वर बाबा ठाकुर यांच्या शहरातील स्वर्गरथ देणगीदार व संचालन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला या बाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील आरोग्य दुत म्हणून ओळख असलेल्या ईश्वर बाबा ठाकुर यांच्या काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ माहेश्वरी रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने शहरातील स्वर्गरथ देणगीदार व संचालन समितीच्या वतीने ईश्वर बाबा ठाकुर यांच्या सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉ योगेंद्र पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पारोळा शहरातील ईश्वर बाबा म्हणुन ओळखले जाणारे ईश्वर ठाकुर यांनी आज पर्यंत अनेकांचे प्राण वाचवले आहेत अनेक अटीतटीच्या प्रसंगी स्वता ईश्वर ठाकुर यांनी रूग्णवाहीके द्वारा रूग्णांना वेळवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचवले आहेत अश्या या आरोग्य दुताचा आज आपल्या स्वर्ग रथ देणगीदार व संचालन समितीच्या वतीने सत्कार करताना मला मनस्वी आनंद होत आहे ईश्वर ठाकुर हे मागील सात महिन्या पासून शहरातील एकमेव अश्या स्वर्ग रथाचे देखील स्वारथ्य करीत आहेत त्यांच्या हातुन सदैव चांगले कार्य घडत राहो अशी सदिच्छा तसेच याप्रसंगी जनसेवक पि जी पाटील यांनी सांगितले की आरोग्य दूत ईश्वर बाबा ठाकुर यांनी वेळ प्रसंगी शहरासह देशातील अनेक ठिकाणी त्यांच्या रूग्ण वाहिके तुन अनेकांचे मृत देह वेळेवर त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचवले आहेत तसेच रात्री अपरात्री कोणत्याही परिस्थितीत ईश्वर बाबा ठाकुर हे एका हाकेवर धाऊन येतात अश्या व्यक्ती चा सन्मान होणे हे शहराच्या दृष्टीने अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे
यावेळी संचालन समितीचे सदस्य डॉ योगेंद्र पवार, समाजसेवक पि जी पाटील, अशोककुमार लालवाणी,स्वर्गरथ संचालक समाधान धनगर, विकास चौधरी, यांच्या सह इतर उपस्थित होते.







