नाशिक (उपसंपादक इजि कुबेर जाधव) : नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या भ्रष्टाचारामुळे वैतागलेल्या केंद्रीय कृषिमंत्र्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांना नाफेड कांदा खरेदीसाठी परवानग्या दिल्या खर्या परंतु त्यासाठी खुपच किचकट नियमावली आणि निकष ठरविण्यात आले, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश सोसायट्यांनी कांदा खरेदी कडे पाठ फिरवली,.
नावालाच पारदर्शकता असल्याचे भासवून बिनबोभाटपणे लुटलं जात आहे, गेल्या वर्षी दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्रासपणे उन्नाळ कांद्या ऐवजी लाल तोही सडका कांदा पुरवला होता, हे पुराव्यानिशी सिद्ध होऊनही काहीही कार्यवाही अद्यापपर्यंत झाली नाही, खुल्या बाजारात खरेदी न करता परस्पर खरेदी केलेला कांदा साठवणूक करून पुन्हा भ्रष्टाचाराला रान मोकळे करू नये.
– कुबेर जाधव
समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक
गेल्या पाच वर्षांत अनेक अग्रो प्रोडुसर कंपन्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला, व्यक्ती त्याच पण नांवे बदलून त्यांनीच मोठ्या प्रमाणात आताही कांदा खरेदी करून ठेवलेला आहे. फक्तं खाजगी गोदामात, प्रत्यक्षात आधीच स्वस्तात खरेदी केलेला कांदा व्यापारी व अग्रोप्रोडुसरवाले ‘नाफेड’चा कांदा म्हणून दाखवला जाईल. त्यातून पुन्हा शेकडो कोटींचा भ्रष्टाचार होईल. पारदर्शक कांदा खरेदी करून घेणे ही केंद्र सरकार बरोबर राज्य सरकारचीही जबाबदारी आहे. कांदा हा बाजार समित्यांमधून थेट लिलावातून खरेदी करावा. तरच शेतकऱ्यांकडून खरेदी झाली असे म्हणता येईल,
शिवार खरेदीमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार समोर आले आहेत. ही कांदा खरेदी ही बाजार समितीच्या आवारातच व्हावी.या बाबत केंद्रीय कृषिमंत्री व ‘नाफेड’च्या अध्यक्षांना ही निवेदनाद्वारे अवगत करण्यात आले आहे.नाफेड आणि एनसिसिएफ ला शेतकऱ्यांशी काही एक घेणे नाही,त्याना शहरी ग्राहकांना भविष्यात स्वस्तात कांदा उपलब्ध व्हावा, म्हणून बाजार हस्तक्षेप करून लाखोंटन कांदा खरेदी करून बफर स्टाक करून ठेवायचा आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नाफेड आणि एनसिसिएफ ने थेट बाजारात उतरुन कांदा खरेदी केला पाहिजे, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील वर्षांसारखाच पडद्याआड खरेदी सुरू केली जात आहे, कुठे खरेदी सुरू आहे याचा थांगपत्ताही लागत नाही,







