कार्यकारी अभियंता युवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले उद्घाटन
नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) । महावितरण कंपनीतर्फे आजपासून शेतकरी व शेती पंपासाठी भऊर सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या भउर विठेवाडी बगडु या गावांना दिवसा आठ तास सलग वीज पुरवठा सुरु झाला आहे.
परंपरागत उर्जेच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य व केंद्र सरकारच्या पर्यावरण पूरक सौर ऊर्जेचा वापर करून अपंमपरांगत विज निर्मिती करून शेतकऱ्यांना दिवसा सलग आठ तास पुर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा सुरू करून शेतकऱ्यांंना मोठा दिलासा दिला आहे वन्यप्राणी व इतर संकटा मुळे रात्री बे रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावं लागतं होते ही समस्या लक्षात महावितरण चे संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी व्यक्तीगत लक्ष घालुन दिवसा वीजेची मागणी पूर्ण करून दिली त्याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले,
या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते कुबेर जाधव यांनी राजेंद्र पवार व इतर अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करत आभार मानले,. महावितरणचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील,उप कार्यकारी अभियंता दिनेश पंवार, सहाय्यक अभियंता जितेंद्र देवरे, विष्णू पवार काशिनाथ पवार रविंद्र पवार, चेअरमन दिपक पवार संजय पवार, सुभाष पवार दिनकर पवार,रा,पा, आहेर सचिन पवार,शरद पवार, ज्ञानेश्वर धोंडगे, अशोक चव्हाण, ईस्वर निकम, विलास निकम ,पंडित निकम, राजेंद्र निकम, विठोबा निकम, भास्करराव निकम, काकाजी निकम, समाधान निकम,दोधा पवार, दादाजी सोनवणे यंत्र चालक हिरामण पवार, योगेश पवार,पोपट सुर्यवंशी हिरामण बछ्चाव , नितीन आहेर, अमोल पाटील आदी अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते डॉ जेडी पवार सोसायटी चेअरमन दिपक पवार यांनी महावितरण कंपनी तसेच उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.







