नाशिक (उपसंपादक इजि कुबेर जाधव) : शारदादेवी ज्ञानविकास मंदिर, देवळा या खासगी शाळेत शिकत असताना तिच्या बुद्धीमत्तेच कायमच कौतुक केले गेले,कु, काजोल हिने माध्यमिक शिक्षण – जिजामाता कन्या विद्यालय, देवळा उच्च माध्यमिक तसेच उच्च शिक्षण- के. टी. एच. एम. कॉलेज, नाशिक स्थापत्य अभियांत्रिकी(बी. टेक.) ची पदवी व्ही. जे. टी. आय. कॉलेज, मुंबई येथून पूर्ण केली. नुकतीच तिची निवड – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा -२०२३ मध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी -2 (AE-2) Class-2 महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागात निवड झाली आहे,
कोणताही खाजगी क्लास न लावता देवळा येथील डॉ,. डी, एस, आहेर या अभ्यासिकेत सातत्याने अभ्यास करून हे उज्वल यश संपादन केले.त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे,स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण, अभ्यास, मेहनत,योग्य नियोजन,सराव,सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी आवश्यक आहेत त्यामुळे च मला हे यश संपादन करता आले, असं तिनं सांगितलं .भविष्यात क्लास-1 पदासाठी प्रयत्न करणार आहे.
माझ्या या यशामागे माझ्या आई-वडिलांची,व माझ्या शिक्षकांची मेहनत, तसेच भावाची साथ लाभली आहे.कु, काजोल हीला पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळाले त्याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे,मा खा भास्करराव भगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव, डॉ जे डी पवार वि,का, सोसायटी चेअरमण दिपक पवार,छोटु आहेर,शरद आहेर यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,कु, काजोल ही देवळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष दिलीप आहेर यांची सुकन्या आहे,







