पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : मद्यप्राशन करून कर्तव्यावर आलेल्या श्रेणी पोलिस उपनिरीक्षकावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्यांचे पोलिस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे.याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत.
पोलिस उपनिरीक्षक माटेकर हे लष्कर वाहतूक विभागात नेमणूकीस आहेत. ते रात्री एक वाजताच्या सुमारास ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह (डी.डी) कारवाईसाठी कर्तव्यावर होते. त्यांनी कारवाईसाठी एक चारचाकी गाडी थांबविली. गाडीतील तिघा व्यक्तींसोबत वाद घातला.दरम्यान, यावेळी माटेकर यांनी मद्यपान केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर माटेकर यांच्या विरुद्ध कर्तव्याच्या ठिकाणी मद्याचे सेवन केल्यामुळे लष्कर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.







