नांदुरा येथे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडीचे प्रस्थान

पंढरपूर

बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : मराठी मनाचे दैवत असलेल्या भगवान विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, पंढरपूरला प्रस्थान करणाऱ्या भक्तांसाठी आज नांदुरा रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे गाडीचे प्रस्थान करण्यात आले. जय हरी विठ्ठलाच्या गजरात, भक्तांनी “माऊली माऊली” चा जयघोष करीत निघालेली ही वारी, महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेचे आणि संस्कृतीचे मूळ स्वरूप अधोरेखित करणारी आहे.

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या भक्ती यात्रेमधून वारीतील वारकऱ्यांचे आशीर्वाद घेण्याचे पुण्य प्राप्त होणे, हे अत्यंत भाग्याचे असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद भाऊ हिवाळी, सरचिटणीस अमोल भाऊ ढोके, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सनी भाऊ तेलंग, युवा मोर्चा शहराध्यक्ष रामसिंह ठाकूर तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
हिरवी झेंडी दाखवून पंढरपूरकडे रवाना झालेल्या वारकऱ्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले. या भक्तीमय प्रसंगी विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिक सुखी, समृद्ध व प्रगत होवोत अशी प्रार्थना करत विठ्ठलाच्या चरणी साकडे घालण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here