खटाव तालुक्यात १३३ सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

आरक्षण

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : खटाव तालुक्यातील १३३ ग्रामपंचायत सरपंच फेर आरक्षण सोडती द्वारे सरपंच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण ८५ नागरिकाचा मागास प्रवर्ग ३६ अनुसूचित जाती १२ अशी सोडत झाली.

वडूज येथील पंचायत समिती बचत सभागृहात आरक्षण निरीक्षक उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने , अप्पर तहसीलदार अनिकेत पाटील, निवासी नायब तहसीलदार महेश गायकवाड, मंडलाधिकारी सचिन कर्णे, लिपिक संजय खाडे आदींसह तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
गाव निहाय सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे: अनुसूचित जाती : महिला प्रवर्ग: निमसोड, तडवळे , डिस्कळ, कोकराळे, भूषणगड, धारपुडी, अनुसूचित जाती खुला प्रवर्ग : कणसेवाडी, गारवडी, शेनवडी, वर्धनगड, त्रिमली, दरजाई
नागरिकांचा मागास प्रवर्ग: महिला प्रवर्ग: खटाव , नेर , गुंडेवाडी , चितळी , चोराडे , एनकूळ , भांडेवाडी , वांजोळी , दखटवाडी , धकटवाडी ,वरुड ,मांजरवाडी ,विखळे ,तरसवाडी ,गणेशवाडी ,लोणी ,अनफळे, पळसगाव, पारगाव
नागरिकाचा मागास प्रवर्ग खुला: विसापूर, उंचीठाणे, होळीचा गाव ,हिंगणे ,पिंपरी ,कलेढोण ,सातेवाडी ,बनपुरी , राजाचे कुर्ले ,शिंदेवाडी, कुरोली सिद्धेश्वर ,मोराळे ,कान्हरवाडी ,लांडेवाडी ,कारंडेवाडी ,पुनवडी ,लाडेगाव
सर्वसाधारण प्रवर्ग महिला प्रवर्ग: मरडवाक ,रहाटणी ,जांब ,खबालवाडी, गारुडी ,वाकळवाडी, नांदोशी ,येरळवाडी ,पुसेसावळी ,पाचवड, मोळ पेडगाव ,वेटणे ,कळंबी ,ललगूण , गारळेवाडी ,गिरजाशंकरवाडी ,धोंडेवाडी ,नढवळ ,पुसेगाव, रेवलकरवाडी ,पवारवाडी ,वाकेश्वर ,गुरसाळे, गोसाव्याचीवाडी, मुसांडवाडी, येलमरवाडी, गादेवाडी ,काळेवाडी ,जाखणगाव नागनाथवाडी ,चिंचणी , खातवळ , जायगाव ,गोपुज ,रणसिंगवाडी, डांभेवाडी ,अंभेरी, बुध, शिरसवडी ,फडतरवाडी नेर , डाळमोडी ,वडी
सर्वसाधारण प्रवर्ग खुला प्रवर्ग: दरूज ,पांगरखेल, म्हासुर्णे ,भोसरे, पांढरवाडी ,नायकाचीवाडी, पळशी ,गोरेगाव वांगी ,कुमठे ,वडगाव, माने तुपेवाडी ,कानकात्रे, कातळगेवाडी, मांडवे ,रेवली ,फडतरवाडी बुध ,दहिवड ,मुळीकवाडी ,भुरकवडी ,काटेवाडी ,कातरखटाव , येळीव ,औंध ,हिवरवाडी, गोरेगाव निम ,खरशिंगे ,पडळ ,खातगुण ,मायणी ,दातेवाडी ,सूर्याचीवाडी ,उंबर्डे ,कटगुन , बोंबाळे, नवलेवाडी ,पोपळकरवाडी, उंबरमळे ,अनपटवाडी ,कामथी तर्फ परळी, ढोकळवाडी ,राजापूर , अंबवडे.
खटाव तालुक्यातील १३३ ग्रामपंचायती मध्ये सर्वसाधारण ४३ महिला, खुल्या प्रवर्गासाठी ४२, नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला १८ तर खुल्या प्रवर्गासाठी १८ आणि अनुसूचित प्रवर्गासाठी महिला ६ व खुला ६ तर अनुसूचित जमाती शून्य असे आरक्षण जाहीर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here