सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : जिल्ह्यातील पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हेगारी टोळीतील सात सराईत गुन्हेगारांना हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सादर केला होता.
पंढरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांनी यासंदर्भात कामकाज चालवून, सविस्तर अहवाल सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने शुभम किशोर लखेरी (रा. विणे गल्ली, पंढरपूर), दिनेश वासुदेव गोमासे (रा.कासारगल्ली, पंढरपूर), ईसा हारुण शेख (रा.सहकार चौक पंढरपूर), यश अनिल चव्हाण (रा.ठाकरे चौक, पंढरपूर), प्रविण उर्फ तात्या देविदास शिंदे, शहाजी देविदास शिंदे, विशाल देविदास शिंदे (सर्व (रा.डोंबे गल्ली, पंढरपूर) यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली. याबाबतची नोटीस हद्दपार केलेल्या इसमांना ताब्यात घेऊन बजावण्यात आली आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ. कल्याण ढवणे, पोना सचिन इंगळे, सिरमा गोडसे, शिवाजी पाटील, प्रसाद औटी, सचिन हेंबाडे, विठ्ठल विभुते, शहाजी मंडले, कपिल माने, समाधान माने, बजरंग बिचकुले, निलेश कांबळे, धनाजी मुटकुळे, दिपक नवले, अनिल शेख, रतन जाधव यांनी केली आहे.







