श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टतर्फे गुणवंत गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनीना सायकल वितरण

सायकल वितरण

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने शिर्डी शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या गुणवंत गरजू विद्यार्थी/ विद्यार्थिनींना आज दि. २९ जून २०२५ रोजी सायकल वाटप करण्यात आले.

ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे- गायकवाड पा.यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सौ. संगीता गायकवाड पा. श्री. साईराज अरुणराव गायकवाड पा. व सहपरिवार तसेच रमेश गोंदकर पाटील जिल्हा उपाध्यक्ष- अहिल्यानगर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,संग्राम कोते पाटील ,प्रदेश सरचिटणीस- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,दीपक गोंदकर पाटील, शिर्डी शहर अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,निलेश शिंदे पाटील युवक अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,सचिन सोपान गोंदकर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शंतनू सुगवेकर माजी क्रिकेटपटू अनिल वाल्हेकर माजी क्रिकेटपटू,खंडोबा मंदिर चे अध्यक्ष संदीप नागरे, शिव छत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक भाऊसाहेब गायके पा.शिवा गोंदकर पाटील- उद्योजक अभिजीत गोंदकर ,पाटील-उद्योजक अजित जगताप पा.,राहुल फुंडे ,संकेत बोराडे ,अमोल सुपेकर, गंगाधर वाघ,आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी ट्रस्ट च्या कार्याचे भरभरून कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शिक्षणसाठी होणारी गैरसोय दूर केल्याने पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हिचं आमच्या कामाची पोहच पावती आहे. शैक्षणिक कामासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना आमच्या ट्रस्ट चे नेहमीच सहकार्य राहील असे ट्रस्ट चे अध्यक्ष अरुणराव शिंदे-गायकवाड पा. यांनी बोलताना सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here