कजगाव बाजारपेठ महत्त्वाची परंतु पोलीस सेवा अपुरी: नागरिकांची तक्रार

कजगाव

भडगाव (तालुका क्राईम रिपोर्टर अमीन पिंजारी) : तालुक्यातील कजगाव येथे पोलीस मदत केंद्रावर कर्मचारी राहत नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे या केंद्राच्या अपूर्णतेमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास अडचणी येत असून नागरिकांनी शासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

कजगाव बाजारपेठ भडगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने येथील पोलीस मदत केंद्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, स्थानिक रहिवाशांच्या मते पोलीस कर्मचारी राहत नसल्यामुळे त्वरित पोलीस सेवा मिळवणे कठीण झाले आहे, आपत्तीच्या वेळी मदत सुरू होत नाही शिस्त बाळगण्यातही अडथळे येतात अशी तक्रार अनेकांनी व्यक्त केली आहे, बाजारपेठ म्हणून कजगावचे व्यापारी पेठाचे महत्त्व वाढले असून या परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांचा स्वतःचा अभाव चिंता निर्माण करणार आहे येथे कर्मचारी राहत नसल्यामुळे नागरिकांचा विश्वास कमी झाला आहे,
कजगाव परिसरातील नागरिकांच्या मत आहे की बरेच वर्षापासून त्यांच्या तक्रार असून देखील पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला असल्याचे दिसून येत आहे, कजगाव पोलीस मदत केंद्र येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी देणे आवश्यक आहे. कजगाव पोलीस
जेणेकरून नागरिकांना त्वरित मदत मिळेल व गुन्हेगारी नियंत्रण ठेवता येईल त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने पुढाकार घेणे महत्त्वाचे ठरले आहे, ज्या समस्येच्या परिणाम फक्त कजगाव परिसरापुरता मर्यादित नसून आजच्या काळात अशा बाजारपेठ मध्ये पोलीस सेवा आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे जेणेकरून नागरिकांना त्वरित मदत मिळेल व गुन्हेगारी नियंत्रण ठेवता येईल त्यामुळे शासनाने याबाबतीत तातडीने पुढाकार घेणे महत्त्वाचे ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here