कजगाव येथे पन्नास हजार रुपये किमतीची तुरदाळ चोरट्यांनी लांबवली; दोन बकऱ्याही केल्या लंपास

कजगाव

भडगाव (तालुका क्राईम रिपोर्टर अमीन पिंजारी) : तालुक्यातील कजगाव येथील रहिवासी आडत व्यापारी रामकृष्ण दयाराम वाणी यांच्या पिंप्री शिवारातील कजगाव नागद या मुख्य रस्त्यालगत असलेल्या शेतामधील गोडाऊन मध्ये साठवलेली ५० हजार रुपये किमतीची तूर आज्ञा चोरट्याने चोरून नेली या घटनेमुळे एकच खडबड उडाली असून शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.

दुसऱ्या एका घटनेत दिनांक सात रोजी सावता माळी चौक येथील रहिवासी शाकीर इस्माईल मन्यार यांच्या पंचवीस हजार किमतीच्या दोन बकऱ्या देखील अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे , शेतकरी वर्गांमध्ये व पशु पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कजगाव परिसरात अशा अनेक चोऱ्या यापूर्वी देखील झाल्या असून प्रत्यक्षात एकही चोरीचा अद्याप तपास नाही.
येथे असलेले पोलीस मदत केंद्र येथे एकही पोलीस कर्मचारी राहत नसल्याने ते देखील वाऱ्यावर आहे कारण या ठिकाणी कधीतरी पोलीस येतात खऱ्या अर्थाने या मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी कजगाव व्यापारी वर्गातून व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणातून होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here