जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जीपीएस मित्र परिवाराच्यावतीने पाळधी आयोजित नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. सकाळी ७ वाजल्यापासूनच विविध गावांमधून वृद्ध, महिला व तरुणांनी शिबिरात सहभाग नोंदवत ५१० रुग्णांची नोंदणी केली. त्यापैकी २१० रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे – तपासणी, औषधे, ऑपरेशन, वाहतूक, नाश्ता व जेवण या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत ठेवण्यात आल्या होत्या. कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता अत्यंत शिस्तबद्ध व कौशल्यपूर्ण नियोजनातून शिबिर पार पडलं. हा उपक्रम पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत राबविण्यात आला.
शिबिराच्या यशामध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील, शंकरा नेत्र रुग्णालयाची तज्ञ टीम, डॉ. राहुल चौधरी, डॉ. राजेश कापसे, डॉ. विजय बामणे, डॉ. रुचिका जंगम, डॉ. अवंतिका रिकामे, डॉ. गुरुप्रित, डॉ. राहुल चौधरी, GPS मित्र परिवार, शिवसेना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध आणि सेवाभावी वृत्तीने सहभाग घेतला.
नेत्रदान म्हणजे जीवनदान असल्यामुळे गोरगरिबांच्या डोळ्यांत नव्या प्रकाशाचा किरण दिसावा. गावा – गावातील गोरगरीब जनतेला दृष्टी म्हणजेच नवीन जीवन मिळावं, हीच माझी खरी जबाबदारी आणि आनंद आहे. आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी अशा शिबिरांची शृंखला सुरुच राहील.
– पालकमंत्री गुलाबराव पाटील
शिबिर संपल्यानंतर अनेक रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी पालकमंत्र्यांच्या कार्याचे कौतुक करत “दृष्टीदान म्हणजेच जीवनदान” आहे. आजच्या या “दृष्टीदान शिबिरा”मुळे हजारो डोळ्यांत नव्या प्रकाशाची आशा निर्माण झाली. जशी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची महाराष्ट्रात ‘पाणीवाला बाबा’ म्हणून ओळख आहे, तशीच आता ते ‘दृष्टी देणारा बाबा’ म्हणूनही प्रसिद्ध होत आहेत. काही जेष्ठ मंडळीनी जीवनात ही घडी अशीच राहो आणि आमचे लाडके नेते गुलाबराव, प्रतापराव, विकी बाबा यांच्या कडून अशीच निस्वार्थ सेवा घडो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना असल्याची प्रतिक्रिया दिली.







